गणेशोत्सव कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता आणि तरीही पर्यावरणाचे संतुलन बिघडवू न देता साजरा करण्याची नितांत निकडीची गरज आहे
ज्या मूर्तीसमोर मनोभावे दहा दिवस पूजा केली, आरती करत राहिलो, विविध कलागुणांचे प्रदर्शन केले, विविध कलाकारांचे कौतुक केले, कीर्तने केली, अथर्वशीर्षपठण केले, सत्यनारायण पूजा घडवून आणल्या त्याच मूर्ती फक्त दहा दिवसांच्या अंतराने विदारक स्वरूपात पुढे आल्या, तर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला मानसिक त्रास होईलच. संवेदनशील समाजात असे काही चुकूनसुद्धा घडू नये, हीच वाजवी अपेक्षा त्यात असते.......